28.2 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriजिल्हा शासकीय रुग्णालयाला डेरवण वालावलकर हॉस्पीटलचा मदतीचा हात

जिल्हा शासकीय रुग्णालयाला डेरवण वालावलकर हॉस्पीटलचा मदतीचा हात

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दर पंधरा दिवसांनी या सहा डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल.

जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. शासनाकडून भरती प्रक्रिया राबवली गेली तरी याला प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या असून, झाल्या तरी त्याचा निकालाबाबत परीक्षार्थीना देखील विश्वास राहिला नाही. गेली अनेक वर्षे हा प्रश्न वंचितच राहिला असून, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच डेरवण वालावलकर हॉस्पीटलने मदतीचा हात दिल्याने मोठा दिलासा प्रशासनाला मिळाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता भासत असून यातून मार्ग काढण्यासाठी काही संस्था आणि खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. डेरवण वालावलकर रुग्णालयाने मदतीचा हात पुढे केला असून, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या ६ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दर पंधरा दिवसांनी या सहा डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. पंधरा दिवस सहा डॉक्टरांची ड्युटी संपली की, त्यानंतर दुसऱ्या सहा डॉक्टरांची नियुक्ती, असे चक्राकार पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता यातील ६ तज्ज्ञ डॉक्टर हजर झाले असून यामुळे शासकीय रुग्णालयांना मोठी मदत होत असल्याची माहिती दिली.

या सहा डॉक्टरांमध्ये फिजिशियन, सर्जरी, पॅथॉलॉजी, भूलतज्ज्ञ, आर्थोपेडिक, रेडिओलॉजी या तज्ज्ञांचा समावेश आहे. या ठिकाणी पीजीचे शिक्षण घेणार्‍या डॉक्टरांची नियुक्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. यातील सहा डॉक्टर आता हजरदेखील झाले असून, त्यांनी कामही सुरू केल्याची माहिती डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. या सहा डॉक्टरांची चांगली मदत होत आहे. डॉक्टर उपलब्ध झाल्याने, आता रुग्णांना ताटकळत रहावे लागत नाही. शासनाने उर्वरित रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular