31.2 C
Ratnagiri
Thursday, May 16, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeRatnagiriजनावरांवरील लंपी स्कीन डिसीजवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन

जनावरांवरील लंपी स्कीन डिसीजवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन

लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य त्वचारोग असून हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशीमध्ये येतो

रत्नागिरी जिल्हयात मागील वर्षी लंपी त्वचा रोग आजाराचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळली होती. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव या वर्षीही रत्नागिरी जिल्हयामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, पिसू तसेच बाधित जनावरांचा स्पर्श दुषित चारा-पाणी यांच्या मार्फत होतो. तरी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती, रत्नागिरी यांनी रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दुष्टिने लंपी स्कीन डिसीज या आजारांचे लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य त्वचारोग असून हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशीमध्ये येतो. देशी वंशाच्या गाईपेक्षा, विदेशी वंशाच्या आणि संकरीत वंशाच्या गायीमध्ये रोग बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामानात हा आजार अधिक वेगाने प्रसारीत होत आहे. या रोगामध्ये अंगावर १० ते २० मीमी व्यासाच्या गाठी येतात. सुरवातीस भरपुर ताप, डोळयातुन, नाकातुन चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद दुध उत्पादन कमी व काही जनावरात पायावर सुज येणे व लंगडणे या सारखी लक्षणे दिसुन येतात.

आजाराचा प्रादुर्भाव मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, पिसवा यांच्या मार्फत होत असल्याने कीटकनाशक औषधांचा गोठ्यात ग्रामपंचायतीच्या मार्फत फवारा मारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्यतो दुसऱ्याच्या गोठ्यात जाणे टाळावे. नवीन जनावरे खरेदी केली असतील तर त्यांना १५ दिवस विलगीकरणामध्ये ठेवावे तसेच गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी व दिवसातील २-३ तास जनावरांना कोवळ्या उन्हामध्ये ठेवावे. तसेच लंपी आजारावरील लस आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखन्याशी संपर्क करून उपलब्ध असल्यास लसीकरण करून घ्यावे.

RELATED ARTICLES

Most Popular