27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunआमदार चव्हाणांचा अखेर शिवबंधन तोडून शिंदे गटात प्रवेश

आमदार चव्हाणांचा अखेर शिवबंधन तोडून शिंदे गटात प्रवेश

कोकणात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त ३ आमदार शिल्लक आहेत

चिपळूणचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अखेर शिवबंधन तोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेले काही दिवस सदानंद चव्हाण व भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीतही त्याचे प्रतिसाद उमटले होते. माजी आमदार सदानंद चव्हाण यांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती; त्याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे भावना व्यक्त करूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे शेवटी त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपला पाठींबा जाहीर केला त्यामुळे आता चिपळूण मतदारसंघात भास्कर यादव यांचे वर्चस्व निर्माण झाले असून ते चिपळूण मतदारसंघात सक्रिय होणार आहेत. भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिकांकडून केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते त्या दृष्टीने विचार करतील असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने जाधव यांनी मातोश्री वर आपले वजन वाढवले आहे. त्याचा फायदा त्यांना होणार असून गुहागर मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्यामुळे त्याचे पडसाद आता गुहागर तालुक्यातही बसणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना भरघोस विकास निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. कोकणात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त ३ आमदार शिल्लक आहेत, यामध्ये गुहागरचे भास्कर जाधव, राजापूरचे राजन साळवी आणि कुडाळचे वैभव नाईक यांचा समावेश आहे. यातल्या राजन साळवी यांच्यावर शिवसेना नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे.

भास्कर जाधव यांची मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना नेतेपदी वर्णी लागली. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांचं प्रमोट केलं. ‘भास्कररावांना विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिली आणि आता लढण्याची वेळ आहे. भास्करराव काय करू शकतात हे १२ आमदारांना विचारा,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular