27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriकोकणात आज अनंत चतुर्दशीच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ

कोकणात आज अनंत चतुर्दशीच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवामुळे घराघरांत निर्माण झालेल्या चैतन्यपर्वाची सांगता होणार आहे.

जिल्ह्यातील घरगुती ३३ हजार ५०० मूर्तींना आज निरोप देण्यात येणार आहे. त्यात रत्नागिरी शहर ११७९, ग्रामीण १५४६, जयगड ६६३, संगमेश्वर ३४४१, राजापूर ६११८, नाटे ६१५, देवरूख ११३५, सावर्डे ७७८, चिपळूण ३९८६, गुहागर ४३५०, खेड २११३, अलोरे १००, मंडणगड १७६, पूर्णगड ९६९, दाभोळे १७९ यांचा समावेश आहे.

कोकणातील गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टला सुरुवात झाली. यंदा दीड लाखाहून अधिक घरगुती गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आणि मुख्य म्हणजे पावसानेही विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता. कोरोनाची बंधने नसल्याने दीड लाखाहून अधिक चाकरमानी उत्सवासाठी कोकणात आले होते. आरत्या, भजने यासह पारंपरिक पद्धतीने या उत्सवाने गावागावांत चैतन्य फुलविले होते.

दीड दिवस, पाच दिवसांनी गौरी-गणपती विसर्जन झाले. वामन द्वादशीला काही गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. काही गावांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस पूजा-अर्चा केल्यानंतर उद्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्याची वेळ अखेर येऊन ठेपली आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवामुळे घराघरांत निर्माण झालेल्या चैतन्यपर्वाची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील ३३ हजार ५०० घरगुती आणि ६५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे समुद्रकिनारी, नद्यांमध्ये भावपूर्ण वातावरणात विसर्जन होईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विसर्जन मिरवणुकांचे नियोजन केले जाते. शहर आणि परिसरात अनेक मंडळे ढोल-ताशांसह बेंजोच्या सुरावर ताल धरत मिरवणुका काढतात. शहरातील बहुसंख्य गणेशमूर्तींचे विसर्जन मांडवी किनारी होते. या परिसरात गणेशमूर्ती नेणाऱ्‍या गाड्यांव्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊन मिरवणुकांमध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मांडवी, भाट्ये किनारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सूचना देण्यात आल्या असून, समुद्रकिनारी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular