27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeSindhudurgदुर्मिळ कोब्रा अवैधरीत्या बाळगल्याप्रकरणी, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दुर्मिळ कोब्रा अवैधरीत्या बाळगल्याप्रकरणी, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाला सायंकाळी याची गुप्त माहिती मिळताच या तरुणाची व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा शोध सुरू झाला.

दुर्मिळ किंगकोब्रा प्रजातीचा साप पाळयेत सायंकाळी एकाने पकडला होता. त्याला अवैधरीत्या बाळगून त्याचे चित्रीकरण करणे, प्रदर्शन करणे यासाठी कथित सर्पमित्र राहुल विजय निरलगी याला वन विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पाळये येथे दुर्मिळ प्रजातीचा किंगकोब्रा साप अवैधरीत्या बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल निरलगी या तरुणाचा जामीन आज न्यायालयाने नाकारला. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली. त्याने अजूनही मोबाईल व किंग कोब्रा साप वन विभागाच्या ताब्यात दिलेला नाही. तसेच, तो तपासात सहकार्य देखील करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाला सायंकाळी याची गुप्त माहिती मिळताच या तरुणाची व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा शोध सुरू झाला. आरोपी नीरलगी याच्याशी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोनवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला; परंतु रिंग होऊनही त्याने कुणाचाही फोन उचलला नाही आणि दुर्लक्ष केले तसेच त्याच्या ताब्यात असलेला दुर्मिळ किंगकोब्रा देखील वन विभागाच्या ताब्यात दिला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

राहुल निरलगी एका एनजीओ अंतर्गत काम करीत होता. गेले दोन-तीन दिवस तो पाळये येथे दिसून येणाऱ्या किंगकोब्रा सापावर पाळत ठेऊन होता. किंगकोब्राला पकडण्यापूर्वी वन विभागाला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे, हे माहिती असूनही त्याने दोडामार्ग येथील स्थानिक वन अधिकारी-कर्मचारी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तो साप अवैधरीत्या पकडून ताब्यात ठेवला.

RELATED ARTICLES

Most Popular