पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत मागील १० दिवसांपासून बेपत्ता आहेत. प्रकरणातील संशयित असलेले पती भाई सावंत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. काल दिवसभर पोलिसांकडून रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने शोध स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे मिळाल्याने संपूर्ण प्रकरणात पतीवरील संशय अधिकच बळावला आहे.
स्वप्नाली या नक्की बेपत्ता की घातपात झाला आहे या दृष्टीनेही पोलिसांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. स्वप्नाली सावंत या दिनांक १ सप्टेंबर रोजी घरात कोणाला ही न सांगता, आणि स्वतचा मोबाईल फोन घरात ठेवून बेपत्ता असल्याची तक्रार पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच २ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
काल पोलिसांकडून रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध सुरू होता मात्र काहीच हाती लागलेले नाही. दरम्यान प्राथमिक संशय असलेल्या पतीचा इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर काही मारामारीचे गुन्हेही दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रत्नागिरी येथील माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांना त्यांचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांच्यावर प्राथमिक संशय असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या घटनेने राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ माजली आहे.
याप्रकरणी अद्याप तपास सुरु असून स्वप्नाली सावंत या ज्या ज्या ठिकाणी जाऊ शकतात त्या सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या बाजुने तपास सुरू आहे. त्यांचे माहेर रत्नागिरी जवळच तळवल येथे असून तिकडेही शोध घेण्यात आला. मात्र, त्या तिकडे गेलेल्या नाहीत. यासाठी काही पथकेही तयार करण्यात आली याप्रकरणी सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास सुरू आहे