26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeSindhudurgबांदा वासियांचे त्याग आंदोलन, आम. नितेश राणेंनी घेतली दखल

बांदा वासियांचे त्याग आंदोलन, आम. नितेश राणेंनी घेतली दखल

कोणतीही तोडफोड, अपशब्द, बँनरबाजी न करता अगदी कंपनीचे नावदेखील न घेता हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

बांदा सरपंच अक्रम खान यांनी कणकवली येथे आमदार राणे यांची भेट घेऊऩ त्यांना करत असलेल्या कापूर कंपनी संदर्भातील त्याग आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली. कापुर कंपनीच्या विरोधात बांद्यात गेले वर्षभर त्याग आंदोलन सुरु आहे. बांदा पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी गेल्यावर्षी सोशल मिडियाद्वारे हे त्याग आंदोलन सुरु केले. त्यांनी स्वत: या कापुराचा वापर बंद केला. जाहीर माफी मागावी अशी मागणी होती.

बांदा बाजारपेठतील काही व्यापाऱ्यांनी गेले एक वर्ष “या” कापुराची खरेदी विक्री बंद केली. यंदा चतुर्थीतही एजंटला विना ऑर्डर माघारी पाठवले. कोणतीही तोडफोड, अपशब्द, बँनरबाजी न करता अगदी कंपनीचे नावदेखील न घेता हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ती जाहिरात टीव्हीवर कमी झाली; पण यु ट्युबवर अजूनही सुरु आहे. आणि अनेकांनी विरोध करून देखील कंपनीने अद्याप जाहीर माफी मागितलेली नाही.

सरपंच खान यांनी बांदा वासियांचा हा विषय आमदार राणे यांच्यासमोर मांडला. आमदार राणे यांनी याची तात्काळ दखल घेतली. या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली व कारवाईचे आश्वासन दिले. पुढे हे आंदोलन वाढून बांद्यातील पाच देवस्थाने, १६ व्यापारी व २०० सेवेकरी यात उतरले. विडंबन करणाऱ्या कापुर कंपनीच्या जाहीराती विरोधात बांद्यातील रामभक्तांनी गेले वर्षभर सुरु ठेवलेल्या त्याग आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे. आणि लवकरात लवकर त्यावर कारवाई होईल असे आश्वस्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular