27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeMaharashtraईडीचे शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल

ईडीचे शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.

गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोप पत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी करोडो रुपये कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. पुढे हे पैसे मालमत्ता संपादन करणे, त्याच्या व्यावसायिक संस्था, कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळवणे इत्यादींमध्ये हस्तांतरित करण्यात आले. अशाप्रकारे संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्ह्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आणि मालमत्तेचे संपादन करण्यासाठी आणि इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सामील होते, असा ईडीचा आरोप आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. कालच संजय राऊत यांच्यावर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

संजय राऊतांनी वाधवान बंधूंसोबत संगनमत करून पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही यात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

संजय राऊत यांना ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आणि चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. पुढे त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. त्यानंतर संजय राऊत यांची काल न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular