26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeDapoliआमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी...!

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी नंतर कोकणात फूट पडल्यावर पक्षातील गळती रोखण्यासाठी राज्यभर निष्ठा यात्रेला प्रारंभ केला. यावेळी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेत नेतेपदी बढती मिळालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांचा वारंवार खोकेवाले, बंडखोर आणि गद्दार असाच उल्लेख केला आहे.

तसेच भास्कर जाधव यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि उदय सामंत यांच्यावर देखील पक्षाशी गद्दारी केल्याने, जहाल शब्दात व्यक्तिगत टीका केली. जाधव यांना उत्तर देण्यासाठी कदम पिता-पुत्रांनी दापोलीत दुसऱ्या दिवशी मेळावा घेवून, जाधवांसह ठाकरे कुटुंबीयांवर अगदी वैयक्तिक स्वरूपावर टीका करण्याची संधी साधली, आणि त्यामुळे राज्यभरात शिवसैनिक संतप्त झाले.

कोकणात भास्कर जाधव एका बाजूने भाजप आणि शिंदे गटाला अंगावर घेवून आरोप करत सरकारविरोधी वातावरण निर्मिती करत आहेत, तर कदम हे शिवसेना स्टाईलने ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणात शिवसेनेत फुट पडण्याचा कार्यक्रम केला तरी, शिवसेनेच्या विरोधात म्हणावी तशी वातावरण निर्मिती झालेली नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाची बाजू मांडताना केसरकर आणि सामंत यांनी नेहमीच संयम पाळला. मात्र, रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंवर कडक शब्दात आणि आक्रमक शैलीत टीका केली. दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केसरकर आणि सामंत यांच्यापेक्षा योगेश कदम यांना अधिक संघर्ष करावे लागणार आहे. तो कमी करण्यासाठी योगेश कदम यांना मंत्रिपद आणि आणखी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular