23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeEntertainmentजॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन

जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

सुरुवातीला जॅकलिन आणि सुकेश यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. सुकेशला डेट करत असताना तिला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामध्ये दागिने, क्रोकरी, चार पर्शियन मांजरी आणि एक घोडा यांचा समावेश होता. पर्शियन मांजरीची किंमत ९ लाख रुपये आहे. त्याचबरोबर घोड्याची किंमत ५२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीसाठी जॅकलिन वकिलाच्या कपड्यात कोर्टात पोहोचली, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.

न्यायालयाने जॅकलिनच्या जामीन अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) उत्तर मागितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सांगितले की, जोपर्यंत त्यांचा जबाब मिळत नाही तोपर्यंत त्यांचा नियमित जामीन न्यायालयात प्रलंबित राहील. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी जॅकलीनची ईडीने सुमारे ७ तास चौकशी केली आणि उत्तरे दिली.

या प्रकरणी ईडीने १७ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून होते. या प्रकरणी जॅकलिनच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने त्याला समन्स पाठवले. याआधीही जॅकलीन या प्रकरणी अनेकदा कोर्टात हजर झाली आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कॉनमन सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून मिळालेले गिफ्ट, डिझायनर कपडे आणि कार याबाबत सुमारे ७ तास चौकशी केली.

RELATED ARTICLES

Most Popular