27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunब्लॅकमेलिंग करणाऱ्याची तक्रार करा, आम्ही कारवाई करू - वनाधिकारी राजेश्री कीर

ब्लॅकमेलिंग करणाऱ्याची तक्रार करा, आम्ही कारवाई करू – वनाधिकारी राजेश्री कीर

जे लोक संशयास्पदरित्या आढळतील त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडे थेट संस्थेसाठी देणगीची मागणी केली जाते.

चिपळूण तालुक्यातील काही शासकीय अधिकारी, कर्मचारी सुट्टीच्या दिवशी ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी जंगलात सफर करायला जातात, तर काहीजण वनसंपदे बाबतीत वेगवेगळ्या जातींवर संशोधनासाठी जंगलात फिरत असतात. सह्याद्रीच्या खोऱ्यात अनधिकृत कॅमेरे बसवून जंगलात भ्रमंती करणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकारही सुरू झाला आहे. अशा लोकांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्यात येते. त्यांच्यात भीती निर्माण व्हावी यासाठी जंगलात राहणारे आदिवासी आणि धनगर बांधवांना अशा लोकांच्या विरोधात भडकवले जात असल्याच्या घटना कानावर येत आहेत.

शासकीय जंगल आणि जंगलातील वन्यप्राणी तसेच वनसंपदा जतन करण्यासाठी आमचा विभाग सक्षम आहे. आम्ही कुणालाही कॅमेरे लावण्याची परवानगी दिलेली नाही. जर कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर आमच्याशी संपर्क करा. वाईल्डलाईफ विभागाची परवानगी घेऊन कॅमेरे बसवले का? याची आम्ही माहिती घेत आहोत. ज्या गावातील व्यक्ती किंवा संस्था अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर गावपातळीवरही कारवाई करण्यात यावी.

वनविभागाच्या परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर यांनी सांगितले कि, याबाबत वनविभागाने कठोर पावले उचलली असून ब्लॅकमेलिंग करणाऱ्याची तक्रार करा, आम्ही अशा व्यक्ती आणि संस्थांवर कारवाई करू, असे सांगितले आहे. कोयनेच्या घनदाट जंगलातील अनेक वन्यप्राणी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात कुंभार्ली घाट आणि डोंगरभागात फिरत असतात. घाटातील कासारखडक आणि इतर भागातील वन्यप्राण्यांच्या वाटा आणि पानवठे असलेल्या परिसरात काही संस्था आणि व्यक्तींनी अनधिकृतपणे कॅमेरे बसवले आहेत.

या कॅमेर्‍याद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या जातात. सोबतच जंगलामध्ये भ्रमंती करणाऱ्या नागरिकांच्याही हालचाली देखील टिपल्या जातात. जे लोक संशयास्पदरित्या आढळतील त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडे थेट संस्थेसाठी देणगीची मागणी केली जाते. देणगी न दिल्यास तुमचे व्हिडिओ वनविभाग आणि पोलिसांना देऊन तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू, अशी धमकी दिली जाते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular