रत्नागिरीचे माजी पालकमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्यांनी दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा करण्यात आले असून मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला गेला तसंच साई रिसॉर्ट पाडलं जाईल असं सोमय्यांनी ठणकावून सांगितल आहे.
किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील घोटाळयाचे स्मारक असा उल्लेख करून मुरुड येथील साई रिसॉर्ट दसऱ्यापर्यंत जमीनदोस्त होईल, असं म्हटलं होतं, मात्र, आता दसऱ्याची तारीख उलटून गेली आहे. सोमय्यांनी, अद्याप पर्यंत तरी कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे ट्वीट केले आहे. मात्र आता निधीची तरतूद झाल्याने ही कारवाई येत्या काही दिवसातच केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं म्हटलं आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली दिली आहे.
सोमय्यांनी यावेळी सदानंद कदम यांनी चौकशीवेळी परब यांनी मला रिसॉर्ट विकले, असं लिहून दिल्याचा दावा केला. दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांचे आहे, असा आरोप सोमय्यांनी केला. वीज आणि कर लावण्यासाठी अनिल परब यांनीच अर्ज केला आहे, असा दावा सोमय्यांनी केला. परब यांच्यावर फौजदारी गुन्हा लवकरच दाखल होईल, यासाठी जास्तीचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत, असं सोमय्या यांनी आपल्या म्हणण्यात सांगितले आहे.