29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiri“या” मार्गावरील ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी

“या” मार्गावरील ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ओव्हरलोड होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी असे निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गाची झालेली चाळण लक्षात घेता, आणि पडलेले खड्डे यामुळे वाहनांची तसेच शारीरिक देखील नुकसान होत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक महिन्यांपासून अपघातांची मालिका लागोपाठ सुरूच आहेत. त्यामुळे त्या महामार्गा नजीक असणाऱ्या शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांची देखील वाहतूक सुरु असते. त्यामुळे त्यांच्या देखील सुरक्षेच्या कारणास्तव तेथील अवजड वाहनांची वाहतूक काही वेळेसाठी बंद ठेवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

निवळी जयगड रोडवर रोज मोठया प्रमाणात ओव्हरलोड वहानांमार्फत वहातूक होत असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे,या रस्त्यावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे याबाबतीत वारंवार संबंधित यंत्रणेला सांगून ही दुर्लक्ष केले जात आहे.

तसेच शाळेच्या वेळेत तरी किमान वहातुक बंद ठेवावी अशी ही मागणी वारंवार करण्यात आली याकडे ही दुर्लक्ष केले जात असल्याने आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ओव्हरलोड होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी असे निवेदन देण्यात आले आहे. नाहीतर त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच २० ऑक्टोबर पूर्वी ओव्हरलोड वाहनांची वहातुक बंद न केल्यास रस्त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी तालुका अध्यक्ष- मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस, ओंकार फडके, तालुका उपाध्यक्ष, संकेत कदम , भाजपा ओबीसी सेल तालुकाप्रमुख नंदू बेंद्रे, नंदकिशोर चव्हाण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular