ऑक्टोबर महिना सुरु झाल्याने काही प्रमाणात वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. तर काही ठिकाणी अजूनही पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. उष्णता वाढल्याने अनेक वेळा सरपटणारी जनावरे गारव्यासाठी मानवी वस्तीच्या आसपास फिरू लागतात. त्यामुळे, अनेक वेळा काही दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते.
चिपळूण तालुक्यातल्या घोणसरे गावामध्ये देखील अशीच दुर्घटना घडल्याने, एका मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. भक्ष्याच्या मागे आलेल्या सापाने दंश केल्याने एका कॉलेजच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण येथे घडली आहे. गाढ झोपेत असलेल्या या मुलीची झोप अखेरची काळझोप ठरली आहे. या मुलीचं नाव सिद्धी चव्हाण असं असून ती अकरावी सायन्स मध्ये शिकत होती.
सिद्धीचं कुटुंब फुलांचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी कॉलेजवरून आल्यावर सिद्धी आपल्या घरामध्ये जाऊन गाढ झोपली होती. नेमकं त्याच दरम्यान घरामध्ये एक उंदीर घुसला आणि त्या उंदराच्या मागावर असलेल्या सापाने सिद्धीच्या घरात शिरून तिला दंश केला.
गाढ झोपेन असल्याने पहिल्यांदी त्या मुलीच्या सापाने दंश केल्याचे लक्षात आले नाही. आणि जेंव्हा ती उठली तेंव्हा तिच्या शेजारी उंदीर होता, तिला वाटले कि त्यानेच चावले असेल. परंतु, विष संपूर्ण शरीरामध्ये भिनल्याने, तिला अस्वस्थ वाटू लागले. त्या नंतर सिद्धीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सिद्धीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, परंतु, रुग्णालयात उपचारा दरम्यान सिद्धीचा मृत्यू ओढवला. या कॉलेज कन्येच्या आकस्मित मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.