27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiri“या” अभिनेत्रीची कोकणात ऑनलाईन फसवणूक

“या” अभिनेत्रीची कोकणात ऑनलाईन फसवणूक

अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांना ऑनलाईन पद्धतीने १७ हजाराचा गंडा घातला आहे.

स्टार प्रवाह मधील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांना ऑनलाईन पद्धतीने १७ हजाराचा गंडा घातला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी त्यांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल त्यांनी दोन दिवसासाठी १७ हजार रुपये देऊन बूक केले होते.

ऑनलाइन बूकिंग नंतर जेंव्हा ते त्या हॉटेलवर गेल्यानंतर वेगळेच प्रकऱण समोर आले. हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने कोणतीच बूकिंग करण्यात आली नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रमोद प्रभुलकर यांनी तिथल्या मॅनेजमेंटला याबाबत चौकशी केली असता, मॅनेजमेंटने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप प्रमोद प्रभुलकर यांनी केला आहे. ही रिसॉर्ट शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले. ही हॉटेल ४ स्टार दर्जाचे असून या ठिकाणी फसवणूक झाल्याने त्यांना एका प्रकारे मोठा धक्का बसला आहे.

परंतु त्याच वेळी ही फसवणूक हॉटेलकडून झालेली नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले आहेत. काही उत्तर भारतीय व्यक्तींने हॉटेलची साईट हॅक केल्याचे यावेळी समोर आले. प्रभूलकर यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीची देखील एक लाख साठ हजारांची फसवणूक झाल्याचा व्हिडओ माध्यमात व्हायरल झाला आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरची चक्क अशा प्रकारची फसवणूक झाल्याने, सर्वत्र हि बातमी पसरली आहे. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुक करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular