27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeInternationalट्विटरची मालकी मिळताच मस्कनी केली ही प्रथम कारवाई

ट्विटरची मालकी मिळताच मस्कनी केली ही प्रथम कारवाई

मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

टेस्लाचे एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर करार पूर्ण केला असून कंपनीची मालकी मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटरची खरेदी केली आहे. या ठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाज माध्यमे कोणत्याही विषयावर अधिक प्रमाणात विभागली जाण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्वीट मस्क यांनी केले होते. तसेच त्यांनी ट्विटर मुख्यालयाला भेट देत ट्वीटरच्या बायोमध्ये ‘ट्वीट चीफ’ असेल लिहिले होते.

एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्यवहारातून काढता पाय घेतल्यानंतर हे प्रकरण डेल्वेअर चान्सरी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने मस्क यांना शुक्रवापर्यंत करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसर २८ तारखेला हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आणि अखेर ट्वीटरचे हक्क आणि मालकी एलॉन मस्क यांनी हाती घेतली.

RELATED ARTICLES

Most Popular