बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते कमल किशोर मिश्रा यांना पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. पोलिसांनी कमलविरुद्ध मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक कमलने काही दिवसांपूर्वी पत्नी यास्मिनला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर यास्मिनने त्याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली.
कमल किशोर मिश्रा यांची पत्नी यास्मिनने आपल्या आरोपात म्हटले आहे की, ‘मी १९ ऑक्टोबरला घरी पोहोचले तेव्हा माझा पती त्याच्या कारमध्ये बसून मॉडेल आयशा सुप्रिया मेमनसोबत रोमान्स करत होता. ते दोघे खूप जवळ आले होते. दोघांना एकत्र पाहून मी गाडीच्या काचेवर ठोठावले आणि काच खाली करायला सांगितली मला काही बोलायचे आहे, पण कमलने माझे ऐकले नाही आणि गाडी वळवून पळू लागला.
यास्मिन पुढे म्हणाली, ‘मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याने माझ्यावरच जबरदस्तीने गाडी चढवली. माझे डोके खूप दुखत होते. परंतु पती कमलने किंचितही माणुसकी दाखवली नाही. तो गाडीतून खाली उतरला आणि मी जिवंत आहे की मेला हेही पाहिले नाही. आमचे ९ वर्षांचे नाते आहे, पण त्या व्यक्तीने माझ्याबद्दल ९ सेकंदही विचार केला नाही.
कमल किशोर मिश्रा हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. तो यूपीचा रहिवासी आहे. त्याने २०१९ मध्ये निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कमल वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवतात. त्यांनी ‘खली बाली’, ‘देहाती डिस्को’, ‘फ्लॅट नंबर ४२०’, ‘शर्मा जी की लग गई’ यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.