25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeRatnagiriआर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडूंच्या मदतीसाठी, रत्नागिरीमध्ये चित्र प्रदर्शन

आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडूंच्या मदतीसाठी, रत्नागिरीमध्ये चित्र प्रदर्शन

व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर  रत्नागिरी येथे दि. २८ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान हे प्रदर्शन असणार आहे.

कोकणामध्ये विविध कलागुण असलेले पण आर्थिक पाठींबा नसल्याने, अनेक खेळाडू आपल्या स्वप्नांपासून दुरावले आहेत. विविध खेळांमध्ये देखील योग्य मार्गदर्शन मिळून देखील पाठबळ नसल्याने पुढे उडी मारण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या चांगल्या प्रतीचे खेळाडूसाठी, त्या क्रीडापटूंचे करिअरला काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी अनुजा तेंडोलकर यांनी चित्र प्रदर्शन भरवले आहे. व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर  रत्नागिरी येथे दि. २८ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान हे प्रदर्शन असणार आहे.

कोकणात कितीतरी खेळाडू असे आहेत ज्यांच्याकडे क्रीडा साहित्य घेण्यासाठी देखील पैशाची कमतरता असते. अनेकदा सकस आहार घेण्यासाठी देखील आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही. अशा खेळाडूंना मदत व्हावी या उद्देशाने अनुजा तेंडोलकर यांनी मागील काही कालावधीपासून चळवळ सुरू केली आहे. अनुजा तेंडोलकर स्वत: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू असल्याने त्यांना क्रीडापटूंना किती प्रकारच्या  अडचणीना सामोरे जावे लागते हे ज्ञात आहे. म्हणून त्यांनी स्वत: तयार केलेल्या पेंटीगच्या विक्रीतून त्या खेळाडूंना आर्थिक मदत करत असतात. त्याच हेतूने त्यांनी व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर रत्नागिरी येथे दि. २८- ३० ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या कालावधीत चित्र प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे.

तसेच सोबतच ‘पोलादी’ हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाला भेट देवून पेंटिंग्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून खेळाडूंना सहाय्य करावे असे आवाहन अनुजा तेंडोलकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular