27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeDapoliदापोलीकरांची प्रलंबित रुग्णालयाची मागणी अखेर पूर्ण

दापोलीकरांची प्रलंबित रुग्णालयाची मागणी अखेर पूर्ण

आमदार योगेश कदम यांनी पूर्वीपासूनच पाठपुरावा केलेल्या दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाला प्रशासकीय पातळीवरून गती प्राप्त झाली आहे.

दापोली उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धन कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याने दापोलीकरांची अनेक वर्षांपासूनची रुग्णालयाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण होणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यावर आमदार योगेश कदम यांनी पूर्वीपासूनच पाठपुरावा केलेल्या दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाला प्रशासकीय पातळीवरून गती प्राप्त झाली आहे.

गेली अनेक वर्षे १०० खाटांची मंजुरी मिळाली आहे, पण या दर्जोन्नतीच्या कामाकडे शासनाकडून दुर्लक्षच होत गेले. या कामासाठी आता निविदा प्रसिद्ध झाल्याने लवकरच हे काम मार्गी लागेल हे आता समोर आले आहे.

दापोली शहरात असलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी १३ कोटी ४० लाख ४२ हजार ५१७ रुपयांची निविदा सूचना प्रसिद्ध झाली आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे असून त्याचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा शासन आदेश १० वर्षापूर्वीच निघाला होता. परंतु, काही प्रमाणात झालेल्या हेळसांड पणामुळे हे उपजिल्हा रुग्णालय हे अद्याप सुविधांसाठी प्रलंबितच राहिले आहे.

दापोलीबरोबर या प्रकारचे श्रेणीवर्धन करण्याचे शासन आदेश निघालेल्या राज्यातील इतर रुग्णालयांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही रुग्णालये ५ वर्षापासून रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी हे काम अनेक वर्षे रखडून पडले होते. मात्र २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर आमदार योगेश कदम यांनी या कामासाठी पाठपुरावा करून शासनाकडून निधी मंजूर करून घेतला.

परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाढीव इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक करण्यासाठी खूप वेळ लागला. पण अखेर हे काम पूर्ण होऊन या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर आवश्यक यंत्रसामुग्रीनेयुक्त असे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत होणार असून कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार असून अधिक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular