25.6 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यातील ७६० एसटी गाड्यांना व्हिटीएस यंत्रणा

जिल्ह्यातील ७६० एसटी गाड्यांना व्हिटीएस यंत्रणा

रत्नागिरी एसटी विभागात व्हिटीएसचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.

रत्नागिरी एसटी विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांमध्ये व्हिटीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम आता पूर्णत्वास आले असून केवळ चाचणी बाकी आहे. लवकरच चाचणी झाली ही एसटीचे जिल्ह्यातील लाईव्ह लोकेशन प्रवाशांना अॅपवर बघता येणार असल्याची माहिती व्यवस्थापक बोरसे यांनी दिली आहे.

एसटी महामंडळानेही आता अद्ययावत यंत्रणेची कास धरली आहे. रेल्वे प्रमाणेच सर्वसामान्यांची लालपरीसुद्धा आता हायटेक यंत्रणेचा अवलंब करणार आहे. एसटी महामंडळाकडून ”व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम” सर्व एसटीमध्ये बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने एसटीचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.

रत्नागिरी एसटी विभागात व्हिटीएसचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ७६० गाड्यांना ही यंत्रणा बसवण्यात आली असून अंतिम चाचणी होणे बाकी आहे. गेली अनेक वर्षे एसटीचे लोकेशन कळावे यासाठी हे व्हिटीएस सिस्टीम बसवण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प मार्गी लागला नव्हता.

एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षांमध्ये वेगळ्या आर्थिक संकटात आहे. कोरोनामुळे ठप्प झालेली सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक मूळ पदावर येत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. तब्बल ५ महिने हा संप सुरू होता. या पाच पहिन्याच्या कालावधीत एसटीच्या हक्काच्या प्रवाशांनी आपला पर्याय शोधला.

सर्वसामान्यांची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) ही यंत्रणा सर्व गाड्यांमध्ये बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ७६० एसटीमध्ये व्हिटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचे कोलमडलेले वेळापत्रक सुधारून प्रवाशांना वेळेत एसटी मिळण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular