28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeChiplunचिपळूणात दारूच्या वाहतूक आणि साठ्याबाबत कारवाई

चिपळूणात दारूच्या वाहतूक आणि साठ्याबाबत कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावरील कारवाई ताजी असताना, पाठोपाठ दुसऱ्यांदा चिपळूण पोलिसांनी दारूची वाहतूक आणि साठ्याबाबत कारवाई केली.

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून, गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विक्रीचे आणि साठ्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी ता. २ रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून कळंबस्ते बौद्धवाडी येथे एका घरात सुमारे चार लाख ७२ हजार रुपयांची दारू जप्त केली. मुंबई-गोवा महामार्गावरील कारवाई ताजी असताना, पाठोपाठ दुसऱ्यांदा चिपळूण पोलिसांनी दारूची वाहतूक आणि साठ्याबाबत कारवाई केली.

मागील अनेक महिन्यांपासून येथे हा साठा केला जात होता. आणि परिसरातील लोकांना पाण्याच्या बॉटल असल्याचे सांगितले जात होते. साठ्याप्रकरणी राजाराम तानाजी जोईल वय ५०, रा. पागनाका, चिपळूण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिसांनी गुटखा व गांजा विक्री विरोधात देखील जोरदार मोहीम उघ‌डली आहे. यामध्ये चिपळुणात लाखो रुपयांचा गुटखा पकडला. या प्रकरणी काहींना अटकदेखील केली, तसेच रेल्वे परिसरात गांजाविक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेत २४ लाख ४५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

या पाठोपाठ कळंबस्ते गमरे बौद्धवाडी येथील मधुकर गमरे यांच्या घरात गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ रात्री १० च्या सुमारास कळंबस्ते येथे पोलिसांनी गमरे याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. हे घर दारूच्या बॉक्सने खचाखच भरलेले होते. या घरातील दारूचे सर्व बॉक्स टेम्पोमध्ये भरले. बॉक्सने हा टेम्पो भरलेला होता. या प्रकरणी पाग येथील राजाराम जोईल या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular