29.1 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

रत्नागिरीतील अट्टल गुन्हेगाराचा कारागृहात अधिकाऱ्यावर हल्ला

रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या व जन्मठेपेची...

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र येणार?

राज्याच्या राजकारणात याआधी अनेकवेळा उध्दव आणि राज...
HomeRatnagiriभाट्ये येथील मच्छीमाऱ्यांसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

भाट्ये येथील मच्छीमाऱ्यांसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

वर्षानुवर्षे मासेमारी करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीना तोंड द्यावे लागते.

रत्नागिरीतील भाट्ये मध्ये मासेमारी व्यवसायाबद्दल अचानक येणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन प्रत्येक मच्छिमाऱ्याला करता येणे गरजेचे आहे. हि आवश्यकता ओळखून, रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छिमार सेवा सहकारी संस्था आणि नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम भाट्ये येथे आयोजित करण्यात आला होता.

मच्छिमारी हा व्यवसाय प्रचंड जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये अनेक वेळा समुद्रात गेल्यावर कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा वेळी घाबरून अथवा गोंधळून न जाता तत्काळ मदत करता यावी यासाठी या व्यवसायातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हृदय विकाराचा झटका येणे,  बोटीवरून तोल जाऊन पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे.

जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना आपत्तीचे व्यवस्थापन या विषयाचे महत्व ओळखून भाट्ये येथील मासेमारांना या कार्यक्रमप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक, श्री राजेश कांबळे,  कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी,  नागरी संरक्षण  केंद्र रत्नागिरीचे उपनियंत्रक श्री मिलिंद जाधव, सहाय्यक उपनियंत्रक उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री मिलिंद जाधव यांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना काही शारीरिक समस्या जाणवली, हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास,   मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR  म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल देखील माहिती देण्यात आली. कार्यक्रमास भाट्ये मच्छिमार सहकारी संस्था भाट्येचे सेक्रेटरी श्री अरमान भाटकर यांचे विशेष सहकार्य आणि  मच्छिमारांच्या आपत्ती प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग लाभला.

RELATED ARTICLES

Most Popular