26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraअब्दुल सत्तारांचे कपडे फाडणा-याला १०  लाखांचं बक्षीस

अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणा-याला १०  लाखांचं बक्षीस

महाराष्ट्र सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली. याचे जोरदार पडसाद कोकणासह संपूर्ण राज्यातही उमटले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जुन्या कार्यालयाजवळ निदर्शने करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला तसेच सत्तार यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली. याचे जोरदार पडसाद कोकणासह संपूर्ण राज्यातही उमटले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. सत्तार यांचा या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा तातडीने घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जयस्तंभ येथे जोरदार निषेध केला. सत्तार यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेटे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर,  बशीर मुर्तुझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, सनिफ गवाणकर, संकेत कदम, संतोष सावंत, शमीम नाईक, नेहाली नागवेकर, कल्पना भिसे, सोनाली मोहिरे, मुनवर मुल्ला, फर्जना मस्तान, सानिया दाऊत, शिफा शेख, वफा शेख, सहारा साखरकर, नौशिन काझी, जुबेर काझी, इरफान मस्तान, समीर भोसले, मतीन बावाणी, गिरीश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्धल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तारांची दिलगीरी नको. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस देणार असल्याचं जालन्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अजूनच वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस असं राष्ट्रवादीच्या जालन्यातील महिला पदाधिकारी रेखा तौर यांनी घोषणा केलीये. रेखा तौर यांच्या विधानामुळे वादात अजून ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular