27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्हीचा प्रकल्प

रत्नागिरी शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्हीचा प्रकल्प

तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे.

रत्नागिरी शहरी भागामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून कॅमेरा बसवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीला हा सीसीटीव्ही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद शहराच्या धर्तीवर रत्नागिरी शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्हीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

प्रजासत्ताकदिनी कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कंपनीने त्याचा ठेका घेतला आहे. कॅमेरा बसवण्यासाठी लागणारी यंत्रणा बसवण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, आदी बारीकसारीक हालचालींवर देखील पोलिसांची नजर राहणार आहे.

नूतन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील शहराच्या सुरक्षेवर आणि वाहतूक कोंडीमध्ये प्रथम लक्ष घालण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शहरात रस्त्यामध्ये वाहतुकीच्यादृष्टीने आवश्यक असणारे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. आता अनेक वर्षे बंद असलेली आणि वारंवार त्यावर खर्च करूनही चालू न झालेल्या सिग्नल यंत्रेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील वाहतूक यंत्रणा सुरू करावी, असे पत्र देखील त्यांनी पालिकेला दिले आहे. त्यामुळे डिसेंबरला सिग्नल यंत्रणा सुरू होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular