27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeLifestyleनैराश्यामध्ये औषधापेक्षा व्यायाम चांगला

नैराश्यामध्ये औषधापेक्षा व्यायाम चांगला

मानसिक आरोग्य संकटाने ग्रस्त असलेले लोकानी दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने, या लोकांमध्ये नैराश्य कमी होते.

मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांमध्ये, व्यायामामुळे निराशेची भावना कमी होते. सायकियाट्रिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, मानसिक आरोग्य संकटाने ग्रस्त असलेले लोकानी दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने, या लोकांमध्ये नैराश्य कमी होते. शिवाय आत्महत्येचा विचारही येत नाहीत.

संशोधकांच्या टीमने १८ ते ६५ वयोगटातील महिलांचा अभ्यास केला. नुकताच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यातील निराशेची आणि आशेची भावना जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले गेले. त्यांना दररोज सुरू असलेल्या थेरपीसह दोन दिवसांचा व्यायाम किंवा बैठी नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आले. यानंतर काही महिलांनी दोन दिवस ३०-३० मिनिटे त्यांच्या आवडीचा व्यायाम केला तर काहींनी त्यांच्या खोलीत एकटे राहून पुस्तके वाचली आणि खेळ खेळले.

अभ्यासात सहभागी असलेल्या प्रत्येकाला एक फॉर्म भरून त्यांच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. दोन दिवस व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये नैराश्य कमी झाल्याचे दिसून आले, तर खोलीत एकट्या असलेल्या महिलांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच, सहभागींना कार्यक्रम समाधानकारक वाटला आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. हा कार्यक्रम राबवणेही सोपे होते.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण त्यांच्या दैनंदिन व्यायामाच्या वेळेबद्दल खूप उत्साही होते. नैराश्यावरील औषधांपेक्षाही चांगला परिणाम झाला. महिलांना बाहेरच्या व्यायामाचा जास्त परिणाम होतो. अभ्यासानुसार, व्यायामामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावनाही वाढली. महिलांना इनडोअर बुक वाचन आणि मैदानी व्यायामाचे काम देण्यात आले. महिलांना बाहेरच्या व्यायामाने बरे वाटले. त्यामुळे आपले मान गुंतवून ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular