26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRajapurअर्जुना आणि कोदवली नद्यांचा गाळ, अभियान राबविण्यात स्थानिक सक्रीय

अर्जुना आणि कोदवली नद्यांचा गाळ, अभियान राबविण्यात स्थानिक सक्रीय

पूरमुक्ती आणि शहर विकासाच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरणार असून, त्याला राजापूर तालुका व्यापारी संघाने देखील विशेष पाठिंबा दर्शवला आहे.

राजापूर तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांना अति पाऊस झाला कि, वारंवार पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. राजापूर नगर पालिका, महसूल प्रशासन आणि लोकसहभागातून शहरातील कोदवली-अर्जुना नद्यांसह धरणातील गाळ उपसा अभियान राबविण्यात येत आहे. पूरमुक्ती आणि शहर विकासाच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरणार असून, त्याला राजापूर तालुका व्यापारी संघाने देखील विशेष पाठिंबा दर्शवला आहे. या अभियानामध्ये व्यापारी सहभागी होणार असून राजापूर वासीयांनीही सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन राजापूर तालुका व्यापारी सघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे.

ब्रिटिशकालीन इतिहासामध्ये राजापूरची एक अनोखी ओळख होती. राजापूर बंदरामध्ये त्या काळी अनेक  ठिकाणांहून जहाज, गलबते याद्वारे आयात केलेला माल उतरविला जात होता. त्यानंतर येथून तो घाटमाथ्यासह अन्य भागामध्ये विक्रीसाठी पाठवला जात असे. त्यामुळे ब्रिटीश काळामध्ये राजापूरची प्रमुख निर्यात केंद्र म्हणून ओळख होती. मात्र काळाच्या ओघामध्ये ज्या नद्यांच्या प्रवाहामधून जहाजे, गलबते राजापूरात येत होती त्या जैतापूर खाडीसह अर्जुना नदीचे पात्र आता गाळाने भरले आहे.

या गाळाचा अनेक वर्षे उपसाच न केला गेल्याने, आत्ता त्याचा उपसा करणे महत्वाचे ठरत आहे. असे असताना लोकप्रतिनिधींसह शासनाचे मात्र या समस्येकडे सपशेल दुलक्ष होत आहे. त्यामुळे इतिहासकालीन राजापूर ही राजापूरची ओळख सद्यस्थितीमध्ये केवळ कागदोपत्रीच राहिला असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान, या गाळ उपसा अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणीच्या अनुषंगाने मंगळवारी दि. २२ रोजी  सकाळी ११ वा. प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजन करण्यात आली आहे. राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीमध्ये नाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह नगरपालिका, महसूल प्रशासन, नागरीक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या करण्यात येणाऱ्या गाळ उपशामुळे राजापूरमध्ये दरवर्षी येणाऱ्या पूराची टांगती तलवार तरी असणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच नदीपात्रासह धरणातील गाळ उपशामुळे एप्रिल-मे महिन्यामध्ये भासणारी पाणी टंचाईची समस्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या अभियानामध्ये सर्वांनी सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. मालपेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular