30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeKhed“या” धरणाचे दरवाजे उघडत तरी कोण?

“या” धरणाचे दरवाजे उघडत तरी कोण?

पाण्याची पातळी अचानक कमी होत असल्यामुळे, पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खेड तालुक्यातील तळवट धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. पाहणी केल्याअंती धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याचे समोर आले. परंतु अशा प्रकारे कोण दरवाजे उघडत आहे याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

पाण्याची पातळी अचानक कमी होत असल्यामुळे, पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडून टाकले होते व धरणाचे दरवाजे अर्धवट उघडण्यात आले होते.

या धरणावर अनेक काळापासून सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्याने, अज्ञाताला हे कृत्य करणे सहजपणे शक्य झाले. कुलूप तुटल्यामुळे धरणातील लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. धरणासारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही देवावर सोपवण्यात आल्याचं दिसून येत आहे. पुढे काही दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण,  असा थेट सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये याची लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे.

सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणी नेमकं कोण सोडते, यामागचे गौडबंगाल काय आहे या सगळ्याचा शोध घेण्याचे एक प्रकारे आव्हानच खेड पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे नक्की पोलीस तपासात काय माहिती समोर येणार, कोण हे कृत्य करते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular