रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील रिसोर्ट वरून चाललेल्या वादावरून किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप लगावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्याची आणि संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दापोली मुरुड येथे अनिल परब यांच्या असलेल्या रिसोर्टच्या जागेबद्दल मागील काही दिवसापासून बरेच वाद सुरु आहेत. पण जमीन मूळ मालकाने शेतजमीन म्हणून टी ४२ गुंठ्याची जमीन विकली, आणि तिथे त्या दोघांच्यातील व्यवहार संपला. पुढे किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे मूळ मालकाच्या बनवत सह्या करून शपथपत्रामध्ये बिनशेती आणि या जागेवर आधीपासूनच रिसोर्ट होते असे भासवत सरकारी दस्तावेजांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. परब यांनी मूळ मालक साठे यांच्याकडून विकत घेतलेल्या ४२ गुंठे शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये तलाठी, सर्कल, ग्रामसेवक यांनी संगनमताने शासकीय शपथपत्रावर खाडाखोड केली असून, कायद्याने तो गुन्हा आहे.
शेतजमिनीच्या पश्चिम भागाला समुद्र आणि मध्ये रस्ता आहे असे स्वहस्ताक्षरामध्ये अधिकार्यांनी लिहले आहे. रिसोर्टमध्ये जायला रस्ता नसल्याने तिथे रस्ता डीपीडीसी मधून बनविण्यात गेला असून त्यासाठी ४०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या जमिनी शेजारी तसे खाजगी जागा आणि डीपीडीसीतून रस्ता केल्याचा फलक लावलेला आहे. पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार निलेश राणे, रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू उपस्थित होते.
माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अनधिकृतपणे बांधलेल्या रिसॉर्ट संबंधी कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.