25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriशहरी भागात वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई

शहरी भागात वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई

वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा पोलिसांना चालकाला पकडून कारवाई करण्यातच अधिक रस असल्याने, वाहतूक शिस्तीचा मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतूक विस्कळित झाल्याचे चित्र आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवर सिग्नल यंत्रणा हा चांगला पर्याय होता. परंतु पालिकेमार्फत बसविण्यात आलेली ही यंत्रणा काही काळापुरतीच चालली असून ती अतिशय तकलादू ठरली आहे. मारूती मंदिर, जेल नाका, राम आळी, गोखले नाका, राणी लक्ष्णीबाई चौक, या ठिकाणी ही सिग्नल यंत्रणा आहे. परंतु, गेल्या काही वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून देखील ती यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत आहे. तीन ते चार वेळा सिग्नल दुरुस्त करण्यात आले. परंतु ती काही दिवसांत स्थिती जैसे थेच.

काही वेळा तर लाल सिग्नल लागून राहणे, वेळ उलटून गेली तरी निळा सिग्नल न लागणे, डाव्या-उजव्या बाजूचे सिग्नल सुरूच राहणे अशा अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे ही सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. ती दोन ते अडीच वर्षे झाली ती सुरूच झालेली नाही. त्यामुळे कोणताही रस्ता ओलांडताना वाहनधारक बिनदिक्कत रस्ता ओलांडत आहेत. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.

एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू आहे. परंतु दुसरीकडे या शिस्तीसाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणा गेली कित्येक वर्षे बंद आहे. पार्किंगचे अनेक प्लॉट आरक्षित आहेत, मात्र त्यांचा विकास मात्र अद्याप झालेला नाही. त्यामुळे नो पार्किंगची कारवाई होते, परंतु पार्किंगसाठी कुठे जागा आहे, हे दाखविणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा पोलिसांना चालकाला पकडून कारवाई करण्यातच अधिक रस असल्याने, वाहतूक शिस्तीचा मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतूक विस्कळित झाल्याचे चित्र आहे.

वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना शिस्त लावली जात असेल तर हा आकडा कमी होणे निश्चित अपेक्षितच आहे. परंतु दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे. याची दखल घेऊन त्यावर कारवाई संबंधित यंत्रणेने करण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी चौकाचौकात वाहतूक पोलिस नियुक्त केले जातात. परंतू त्यांचे टार्गेट वसुलीचेच असल्याचे दिसून येते.

RELATED ARTICLES

Most Popular