29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeDapoliदापोलीतील राज ठाकरे त्यांच्या शॉर्ट व्हिझीटमुळे, अनेकांचा हिरमोड

दापोलीतील राज ठाकरे त्यांच्या शॉर्ट व्हिझीटमुळे, अनेकांचा हिरमोड

राज ठाकरेंनी गाडीचं दार उघडलं त्यांनी उतरून फुटपॅड उभे राहिले, हात जोडून मोठा नमस्कार केला अभिवादन केलं व ते पुन्हा गाडीत बसले आणि पुढे मार्गस्थ झाले.

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना विविध ठिकाणी ठाकरेंच्या स्वागतासाठी अनेक पदाधिकारी, नागरिक तासनतास सज्ज होते. असंख्य कार्यकर्ते व असंख्य नागरिक राज ठाकरे यांना भेटतील राज ठाकरेंना पाहता येईल, ते काय बोलतात ते ऐकता येईल यासाठी सायंकाळीपासून त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून  होते. पण त्यांच्या शॉर्ट व्हिझीटमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. राज ठाकरेंचा ताफा संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दापोलीत दाखल झाला. यावेळी राज ठाकरेंनी गाडीचं दार उघडलं त्यांनी उतरून फुटपॅड उभे राहिले, हात जोडून मोठा नमस्कार केला अभिवादन केलं व ते पुन्हा गाडीत बसले आणि पुढे मार्गस्थ झाले. यामुळे उपस्थित नागरिकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

खरे पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे दापोली दौऱ्यावर येणार म्हणून त्यांच्या मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती. सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे दापोली शहरात येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य नागरिक राज ठाकरेंना पाहण्यासाठी भेटण्यासाठी ते बोलतात ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, राज ठाकरेंनी अशी कोणतीही भेट व वेळ न देता केवळ गाडीबाहेर येऊन पुढील सीटच्या डोअरमधून बाहेर आले नमस्कार केला आणि पुन्हा कारमध्ये बसले व निघून गेले.

राज ठाकरेंची भेट न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. इथे असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते थांबतील असा अंदाज होता. पण तोही अनेकांचा अंदाज राज ठाकरे यांनी चुकवला आहे. जवळपास एक ते दोन तास दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या केळस्कर नाका परिसरात संध्याकाळी पाच वाजल्यापासून असंख्य पदाधिकारी आणि नागरीक थांबून होते. त्यांचे स्वागत करून फटाकांच्या आतषबाजी करत फटक्यांची माळ लावण्याची तयारी ठेवली होती. पण राज ठाकरे यांनी शॉर्ट व्हिझीट करत ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

RELATED ARTICLES

Most Popular