29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

दापोलीतील सुवर्णदुर्ग वारसास्थळात शिवरायांच्या किल्ल्यांना जगाचा मुजरा

आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना...

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...
HomeRatnagiriसोने चोरांचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश

सोने चोरांचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश

रत्नागिरी शहरातील घरकुल अपार्टमेंट मधील २६ तोळे सोने चोरीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आसून अन्य एकाचा शोध सुरू आहे. चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात यश आले आहे.२७ जानेवारी रोजी शहरातील मांडवी रोड येथील घरकुल अपार्टमेंट मधील एका फ्लॅटचा दरवाजा एका अज्ञात इसमाने कडी व कोयंडा तोडला होता. यावेळी फ्लॅट मधील एकूण २६ तोळे सोने व ३० हजार इतकी रोख रक्कम चोरण्यात आली होती. या घरफोडीच्या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत निरंतर तपास चालू असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.

या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एका इसमास फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेड-रुम मधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या दोघांना २५ मार्च रोजी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीत यांचेकडे गुन्हयातील चोरी केलेले दागिन्याबाबत विचारपूस केली असता आरोपीत यांनी गुन्हयातील चोरी केलेले दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे कबूल केले.

२७ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्हयातील आरोपी क्रमांक ३ याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. परंतु आरोपी यांनी गुन्हयातील चोरीस गेलेले दागिने विक्री। केलेल्या सोनाराचे दुकान दाखविले असता या सोनाराचे दुकानातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले. या गुन्ह्यातील एकूण चोरीस गेलेले विविध सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३० हजार असा एकूण ८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीत यांना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. तसेच या महिलेच्या, (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोउनि आकाश साळुंखे, पोहेकाँ प्रसाद घोसाळे, प्रविण बर्गे, अमोल भोसले, पोना संकेत महाडीक, मनोज लिंगायत, आशिष भालेकर, पंकज पडेलकर व विनय मनवल यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular