22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunपेढे गावाला मिळणार संरक्षण परशुराम घाटात दगडाची भक्कम भिंत

पेढे गावाला मिळणार संरक्षण परशुराम घाटात दगडाची भक्कम भिंत

खेड व चिपळूणला जवळ असणाऱ्या परशुराम घाटातील सतत कोसळणाऱ्या दरडी व त्यामुळे पेढे गावाला निर्माण झालेला धोका पाहता येथे काळ्या दगडाची मजबूत भिंत उभारण्यात येत आहे.या भिंतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या भिंतीला लोखंडी मजबूत जाळीचे संरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पेढेवासीयांना दरडीपासून संरक्षण मि ळणार आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा घाट असलेल्या परशुराम घाटात दरड कोसळणे हे नेहमीच्या पावसाळ्यातील समीकरण राहिले आहे; परंतु महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेली डोंगरकटाई दरडीचा धोका वाढवणारी ठरली आहे. जुलै २०२१ मध्ये अशाचप्रकारे मोठी दरड थेट घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावात कोसळली आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी काहींवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत, तर पोकलॅन म शिनवर अजस्त्र दरड कोसळल्याने एका कामगाराचाही मृत्यू ओढवला होता. अशा या जीवघेण्या दरडीची दखल येथील लोकप्रतिनिधींसह शासनाने घेऊन वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ परशुराम घाटात पाठवले होते.

संपूर्ण सर्वेक्षण करून व माती परीक्षण केल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी व पेढे गावाला पूर्ण संरक्षण मिळावे म्हणून येथे संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व तातडीने भिंतीचे कामदेखील सुरू केले होते. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या होत्या.संरक्षण भिंतीचे काम अंतिम टप्यात आले आहे. काळ्या दगडाची मजबूत भिंत येथे उभारण्यात येत असून, भिंतीला रासायनिक प्रक्रिया केलेल्या लोखंडी व मजबूत जाळीचे आवरणदेखील देण्यात येत आहे. दरड खाली आली आणि त्यामुळे भिंत फ टली तरी लोखंडी जाळी त्याला सहज रोखू शकते. परिणामी, धोका कमी होईल अशा पद्धतीने रचना केली आहे. तसेच भिंतीच्या आतील बाजूने रासायनिक लेप असलेला मजबूत असा प्लास्टिकङ्ग पेपर अंथरण्यात आला आहे; जो दरडीची मातो भिंतीत जाऊ देणार नाही. अशा अत्याधुनिक भक्कम पद्धतीने भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ठेकेदार व अधिकारी सतत या कामावर लक्ष ठेवून आहेत. भिंतीचे 5 काम पूर्ण झाल्यास पेढे गावाला व क पायथ्यालगतच्या घरांना पूर्ण संरक्षण मिळणार असून, भीतीचे सावटदेखील दूर होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular