आयडीसीतील उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असून, त्यादृष्टीने नवनवीन योजना आणल्या जात आहेत. महाराष्ट्रात उद्योजकांना गतिमान पायाभूत सुविधा देता याव्यात यासाठी पाचशे कोटींचा निधी देण्यात आला. स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळाण्यासाठी नवे उद्योग येणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठीच वर्षभरात रत्नागिरी विनमानतळ वाहतुकीसाठी सुरू करणार असून, नाईट लँडिंगची सुविधाही समाविष्ट राहील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र (मिरजोळे ब्लॉक) येथील अनिवासी इमारत नवीन अतिथीगृहाचे बांधकाम आणि जुन्या अतिथीगृह इमारतीचे नूतनीकरण कामांच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, “रत्नागिरीमध्ये येणारे मोठ्या उद्योजकांना तसेच येथील उद्योजकांना बैठक घेण्यासाठी सेव्हन स्टारसारखे विश्रामगृह पाहिजे आणि यासाठी रत्नागिरीत सुसज्ज विश्रामगृह उभारले जात आहे. तसेच जुन्या विश्रामगृहाचेही नूतनीकरण होत आहे. यासाठी निधी मंजूर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योगजगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये एमआयडीसीला जोडणारे शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतील रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपये तर एमआयडीसीमधील आवश्यक रस्त्यांसाठी १३ कोटी मंजूर केले आहेत. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटीसह अन्य पायाभूत सुविधांसाठी निधी दिला आहे.
येथील एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांच्या ८८ कायम करण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून त्यांना येत्या दोन दिवसांत आदेश प्राप्त होतील.” दावस येथे रत्नागिरीसाठी एक करार झाला असून इव्ही व्हेईकलचा अमेरिकन बेस कारखाना रत्नागिरीत होत आहे. लोटे एमआयडीसीत नवीन उद्योग येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले असून त्याची इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीत होईल. रायगड येथे स्कील इंडस्ट्रीज होत असून रत्नागिरी येथील उपकेंद्राला तत्वतः मान्यता दिली आहे. रत्नागिरी इंडस्ट्रीजत डी प्लस पेक्षा चांगल्या सोई सुविधा देण्यात येतील. उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळावर उत्कृष्ट धावपट्टी आहे. वर्षभरात ते सुरू होईल, तसेच महिनाभरात या विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, उद्योजक दिलीप भाटकर फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.