28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeRatnagiriजिल्ह्यातील उपविभागीय दर्जाच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील उपविभागीय दर्जाच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील उपविभागीय दर्जाच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनितकुमार चौधरी यांची बढतीने नवी मुंबई डायल ११२ च्या उपविभागीयपदी बदली करण्यात आली आहे. खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद यांची बदली बृहन्मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्त पदावर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्याही बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विनितकुमार चौधरी यांना उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर बढती मिळाली आहे. अडीच वर्षे ते रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली. अनेक गंभीर गुन्ह्यांची त्यांनी उकल केली. खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण बाबासो काशिद यांची बदली बृहन्मुंबईच्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

गेले दोन वर्षे ते खेड येथे कार्यरत होते. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांची नाशिक शहर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळूरपीट येथील यशवंत केडगे यांची बदली लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण येथील राजेंद्र मुणगेकर यांची बदली खेड उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर झाली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या मनोज सावंत, नीलेश नाईक यांनी कार्यालय अधीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. मनोज सावंत यांना रत्नागिरी येथे कार्यालय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. नीलेश नाईक यांना सिंधुदुर्ग येथे कार्यालय अधीक्षक पदावर बढती मिळाली आहे.

रत्नागिरीतील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पवार, प्रकाश पांढरबळे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. आनंदराव पवार यांची बढतीने पालघर येथे, तर प्रकाश पांढरबळे यांची रत्नागिरी येथेच नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नवीन तीन उपअधीक्षक रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत. यामध्ये संध्या बुधाजी गावडे पोलिस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, नीलेश सुरेश माईनकर पोलिस उपअधीक्षक मुख्यालय, रत्नागिरी, तर राजेंद्र कुमार हिंदूराव राजमाने उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular