22.7 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriUPDATE | जिल्ह्यातील संचारबंदी आणि लॉक डाऊन

UPDATE | जिल्ह्यातील संचारबंदी आणि लॉक डाऊन

रत्नागिरी जिल्हा अजूनही चौथ्या स्तरामद्धे असल्याकारणाने जिल्ह्यात संचारबंदी आणि विकेंड लॉक डाऊन हा कायम ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन कारणासाठीच रत्नागिरीकरांना प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

रत्नागिरीतील गेल्या दोन आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट १०.८६ टक्के झाला आहे, तर ऑक्सीजन बेड ची व्याप्ती ही ४० टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या जरी कमी होत असताना दिसली तरी शासनाने निर्देशित केलेला स्तर निश्चित करताना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची संख्या लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाऊ शकतो. सद्यस्थितीमध्ये कोरोंनाचा एक नवीन व्हेरीअंट जिल्ह्यामध्ये सापडल्यामुळे तसेच त्यामुळे एक रुग्णाचा मृत्यूदेखील झाल्यामुळे जिल्ह्यातील संचारबंदी आणि लॉक डाऊन हे अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत.

ratnagiri police lockdown

जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये निर्बंध हे अजूनही शिथील केलेले नाहीत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठीच हे प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केलेले आहेत. RT-pcr चाचण्यांचे अहवाल आणि पॉझिटिव्हिटी दर विचारात घेऊन रत्नागिरी जिल्हा हा अजूनही चौथ्या स्तरांमध्ये ठेवला गेला आहे. लोकांनीही शासनाच्या आदेशांचे पालन करुन शासनाला मदत करावी असे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे रत्नागिरीकर अजूनही तिसऱ्या स्तराच्या शिथिलते पासून वंचित राहिलेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular