31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeRatnagiriरत्नागिरीत उसन्या पैशाच्या वादातून हाणामारी...

रत्नागिरीत उसन्या पैशाच्या वादातून हाणामारी…

२ हजार रूपयांच्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. लोखंडी रॉड आणि फाईट व लोखंडी टेबल यांच्या सहाय्याने झालेल्या या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता रूग्णालयात येऊन काहीजणांनी मारहाण केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अक्षय प्रकाश नाखरेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून हर्षद धुळप, अभिषेक पांचाळ, सुमित शिवलकर, आशिष सावंत, अमेय मसुरकर आणि अन्य ५ ते ६ जणांवर भा.दं.वि.क. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

उसन्या पैशातून वाद – या घटनेविषयी रत्नागिरी शहर पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार शहरातील घुडेवठार येथे राहणाऱ्या एका तरूणाने त्याच परिसरात भाड्याने राहणाऱ्या दुसऱ्या तरुणाकडून २ हजार रूपये उसने घेतले होते. हे पैसे परत मागण्यासाठी तो तरूण गेला असता बाचाबाची, झाली.

फिल्मी स्टाईल हाणामारी – बाचाबाची सुरू होताच त्याचा राग संबंधित तरूणाला आला आणि त्याने आपल्या मित्रांना बोलावले. मित्रमंडळी येताच वादाला तोंड फुटले आणि ऐन रात्री फिल्मी स्टाईल हाणाम जारी झाली. माझ्या मित्राला मारतोस काय असे विचारत चार-पाचजणांच्या गटाने तरूणाला बेदम मारले. लोखंडी रॉड, फाईट, लाकडी टेबल आदींचा वापर करत झालेल्या हाणामारीत अक्षय प्रकाश नाखरेकर (वय ३१, रा. घुडेवठार, रत्नागिरी) हा तरूण जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

रूग्णालयात येऊन मारहाण – मात्र मारहाण करणाऱ्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढलेला होता. अक्षयला रूग्णालयात येऊन मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत’ नमूद करण्यात आले आहे. हॉस्पिटलम ध्ये मारहाण होताच डॉक्टर आणि नर्से स यांची धावाधाव झाली. अक्षयला बेडवरून खाली पाडण्यात आले. तर त्याच्या नातेवाईकांनाही मारहाण झाल्याची चर्चा सुरू होती. याप्रकरणी अक्षय प्रकाश नाखरेकर याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली असून त्याआधारे पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून हर्षद धुळप, अभिषेक पांचाळ, सुमित शिवलकर, आशिष सावंत, अमेय मसुरकर व इतर ५ ते ६ जणांवर भा.दं.वि.क. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी रॉड, लोखंडी फाईट, लोखंडी व लाकडी टेबल, ट्रे, प्रेशर मशीन, दगड यांचा वापर करून ही हाणामारी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे..

RELATED ARTICLES

Most Popular