30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeRatnagiriमुंबई - गोवा महामार्गावर हातखंबा ते निवळी रस्त्याचा भराव खचला

मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा ते निवळी रस्त्याचा भराव खचला

पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार होती. त्यामुळे हातखंबा ते निवळी यादरम्यानचा रस्ता खचला आहे. मुसळधार पावसाने चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची बॅटिंग सुरुच आहे. येथे सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा मुंबई – गोवा महामार्गावरील रस्त्याला देखील मोठा फटका बसला आहे. बहुतांश ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील रस्ता खचला आहे. ही घटना हातखंबा ते निवळी ‘ दरम्यान घडली आहे. रस्ता खचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येताहेत. यामुळे मुंबई गोवा म हामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या भागात पावसाचा जोर वाढला आहे. ज्या भागात रस्ता खचला आहे तेथे कालपासून ठेकेदारानं दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान गुरुवारपासून जेसीबीच्या साह्याने खचलेला भागाची डागडूजी सुरु आहे. परंतु या कामातही पावसाचा अडथळा येत आहे.

दरम्यान पावसाचा फटका रत्नागिरी गणपतीपुळे मार्गाला देखील बसला होता. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. अनेक भागात दमदार पाऊस पडला. तसेच दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीत पाऊसधारा सुरु होत्या. चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद पडली होती.

गुरुवारी सकाळी साखरपा देवरुख मार्गावर रस्त्यावर झाड कोसळण्याने काही तासांसाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शाळकरी मुले आणि कर्मचारी वर्गाला याचा मोठा फटका बसला. झाड पडल्याची माहिती मिळताच म हावितरण कर्मचारी, संबधीत खात्याचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेवून रस्यात पडलेले झाड कटरच्या सहाय्याने तोडून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. तर दुसरीकडे चिपळूण तालुक्यातील पिंपळी नांदिवसे येथे रस्त्यात झाड कोसळले होते. या ठिकाणची वाहतूक देखील बंद झाली होती. गावकऱ्यांच्या पुढाकाराने हा मार्ग तत्काळ मोकळा करण्यात आला.

संगमेश्वर तालुक्यातील डावखोल येथे रमाकांत पाडुरंग शिंदे यांच्या घरा समोरील संरक्षक भीत कोसळून एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. तर माखजन येथे विजय धोंडू कातकर यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मौजे कोंडीवरे येथे मिलंद कदम यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु झाला असताना महामार्ग डोकीदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी परशुराम घाट, चिपळूण येथे दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबधित ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन यांना सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular