31.8 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriस्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाला गळती, बादल्या लावण्याची आली वेळ...

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाला गळती, बादल्या लावण्याची आली वेळ…

मुसळधार पावसाचा फटका पालिकेच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाला बसला आहे. पावसामुळे नाट्यगृहाच्या छताला गळती लागली असून, थेट रंगमंचावर पाणी पडत आहे. गळतीला कर्मचाऱ्यांना चक्क बादल्या लावायची वेळ आली आहे. याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केली असता, त्यांनी गळतीबाबत इन्कार केला. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील गैरसोयीबाबत अनेकवेळा चर्चा झाली आहे. कुचकामी वातानुकूलित यंत्रणेचा भांडाफोड अभिनेता भरत जाधव यांनी मे महिन्यात केली होती. त्यानंतर अनेक रंगकर्मी एकत्र येऊन या नाट्यगृहाच्या समस्येबाबत पालिकेला निवेदन दिले होते. त्यानंतर पालिकेने नाट्यगृहाच्या विंगा तसेच नाट्यगृहाचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावही नाट्यगृहाला झळकल्याने नाट्यगृहाबाबत येथील कलाकार-रंगकर्मीची नाराजी दूर झाली; मात्र पावसाळा सुरू होताच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील गळतीच्या गंभीर प्रश्नाने डोके वर काढले आहे.

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाट्यगृहाच्या छताला गळती लागली आहे. गळतीचे पाणी रंगमंचावर पडत आहे. रंगमंचाच्या उजव्या बाजूला पावसाचे पाणी ठिपकत आहे. गळती असलेल्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन बादल्या लावण्यात आल्या आहेत. या गळतीमुळे रंगमंच खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी गळतीबाबत नकार दिला. आम्ही कालच पाहणी केली होती, कुठे गळत नाही. तरी आम्ही माहिती घेऊन सांगतो, अशी उत्तरे देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular