26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiri'शिवसेनेच्या वाघाची रत्नागिरीत एन्ट्री' शहरात लागलेल्या बॅनर्सची एकच चर्चा

‘शिवसेनेच्या वाघाची रत्नागिरीत एन्ट्री’ शहरात लागलेल्या बॅनर्सची एकच चर्चा

‘शिवसेनेच्या वाघाची रत्नागिरीत एन्ट्री’ अशा आशयाच्या बॅनर्सने रत्नागिरी शहर परिसरात शनिवारी एकच खळबळ उडवून दिली. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स आणि त्यावरचा हा मजकूर सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रत्नागिरीचे आमदार व पालकमंत्री उदय सामंत शिंदे गटात. गेल्याने ठाकरे गटातील या मतदार संघातून राजन साळवी. निवडणूकं लढवतील असे संकेत या पोस्टर्सच्या माध्यमातून दिले जात आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा रविवार दिनांक ९ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. दरवर्षी राजापूर, लांजा व साखरपा परिसरात त्यांचा वाढदिवस शिवसैनिक दणक्यात साजरा करतात. मात्र यावर्षी रत्नागिरीतही त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर या बॅनरवरचा मजकुरही विशेष लक्षवेधी ठरला आहे. ना. उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठी आ. राजन साळवी यांना रत्नागिरीतून निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते, असे संकेत यापूर्वीपासूनच प्राप्त होत आहेत. मात्र या बॅनरबाजीने पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

आ. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील समर्थकांनी व ठाकरे गटाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शहरात भगवे झेंडे आणि शुभेच्छांचे फलक लावले आहेत. त्याचबरोबर स्वागताचे फलकही आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आ. राजन साळवी यांनी रत्नागिरीच्या राजकारणात ‘एन्ट्री’ केल्याचे म्हटले जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी रत्नागिरीत राजन साळवी यांचे शक्तीप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे. संध्याकाळी ७ वा. आठवडा बाजार येथील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द रत्नागिरी येथूनच सुरू झाली आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाचीही जबाबदारी सोपवली होती. कठीण प्रसंगात त्यांना राजापुरातून उमेदवारी दिली गेली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी विजयही मिळवला होता. राजापुरात त्यांनी घडविलेला चमत्कार ते रत्नागिरीतही घडवू शकतात, असा समर्थक शिवसैनिकांचा विश्वास आहे.

गेल्या काही महिन्यात राजन साळवी यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज ‘उठवण्याची भूमिका घेतलेली पहायला मिळाली. जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद यांसह अनेक विषयात त्यांनी हात घातला असल्याचे पहायला मिळाले. यामुळे ते रत्नागिरीतून ते ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यात राजन साळवी यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज ‘उठवण्याची भूमिका घेतलेली पहायला मिळाली. जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद यांसह अनेक विषयात त्यांनी हात घातला असल्याचे पहायला मिळाले. यामुळे ते रत्नागिरीतून ते ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular