27.1 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriखुनाचा वाद १४ वर्षानंतर पुन्हा उफाळला - तुफान धुमश्चक्री

खुनाचा वाद १४ वर्षानंतर पुन्हा उफाळला – तुफान धुमश्चक्री

१४ वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेला असताना सोमेश्वर येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवि मयेकर यांचा खून झाला होता.

सोमेश्वरमधील रवि मयेकर खून प्रकरणाचा वाद १४ वर्षांनंतर उफाळून आला आहे. जन्मठेपेतून सुटलेल्या तरूणाला खुन्नस देण्यावरून रविवारी तुफान धुमश्चक्री उडाली. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी रविवारी समोरच्या गटातील एका तरूणाला रस्त्यात अडवून लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाल खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी एक तक्रार दाखल झाली असून त्याच्या परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होती. १४ वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेल असताना सोमेश्वर येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवि मयेकर यांचा खून झाला होता. दिवाळी सणाच्या आदल्या रात्री हा खून झाला. या खून प्रकरणानंतर सोमेश्वर गावात रात्रीच्या सुमारास संतप्त पडसाद उमटले होते. दगडफेक झाली होती. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

जन्मठेपेतून बाहेर – मिळालेल्या माहितीनुसार रवि मयेकर खून प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या शिक्षेविरोधात आरोपी रुपेश मयेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायालया रुपेश याची जन्मठेपेतून सुटका केली होती. सुटकेनंतर तो सोमेश्वर गावी दाखल झाला होता.

खदखद सुरू झाली – रुपेश उच्च न्यायालयान सुटल्यानंतर तो गावी परतला. तो घर आल्यानंतर रवि मयेकर यांच्या कुटुंबात खदखद निर्माण झाली  होती. दोन-चार वेळा हमरीतुमरी झाल्याची कुजबूज गावात सुरू होती.

खुन्नस विकोपाला – रुपेश मयेकर बाहेर आल्याने खुन्नस सुरू झाली. ही खुन्नस इतकी विकोपाला गेली की पुन्हा काही तरी होईल अशी भीती गावात निर्माण झाली होती. या वादात ठिणगी पडेल अशी शक्यता वर्तवली जात असताना रविवारी ही खुन्नस विकोपाला गेली.

धुमश्चक्री उडाली – पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७ वाजता सुरज मयेकर हा सोमेश्वर ग्रामपंचायतीजवळ असलेल्या एका टपरीवर उभा होता. यावेळी चार तरूणांनी सुरज याच्यावर हल्ला केला. लाठ्याकाठ्यासह लोखंडी रॉडचा वापर करीत सुरज याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर संशयित मारेकरी आपापल्या घरी निघून गेले होते, असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

वचपा काढला – रविवारी सुरज याला मारहाण झाल्यानंतर त्याचा वचपा काढण्यासाठी काहीजण त्याच टपरीवर दबा धरून होते. यावेळी दीपक मयेकर उर्फ बाब्या आपल्या दुचाकीवरून रत्नागिरीत यायला निघाला होता. यावेळी दीपक याला रस्त्यात अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे.

रस्त्यात पाडून मारले – दीपक हा बेसावध असताना अचानक त्याची दुचाकी अडवून त्याला मारहाण झाली. दीपक याच्या डोक्यात हेल्मेट होते. मारहाण सुरू होताच दीपकने डोक्यातील हेल्मेट काढले. हेल्मेट काढताच त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याचा प्रहार करण्यात आला. त्याला रस्त्यात पाडून जबर मारहाण करण्यात आली.

खासगी रूग्णालयात दाखल – दीपक मारहाणीत जखमी झाल्याने त्याला तात्काळ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या मारहाणीची तक्रार करण्यासाठी दीपक याचे नातेवाईक ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाले.

गुन्हा दाखल – रविवारी झालेल्या मारहाण प्रकरणात सुरज मयेकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी रूपेश मयेकर, विरेंद्र शिंदे, संदीप कदम (सर्व) रा. सोमेश्वर) यांच्याविरोधात भादंविक ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परस्परविरोधी दाखल होणार सोमवारी दीपक मयेकर याला झालेल्या मारहाणीमुळे या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी ग्रामीण पोलीस दीपक याचा जबाब नोंद्रविण्यासाठी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाले होते- सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल्या करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular