28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurराजापूर पालिकेत घनकचरा प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती

राजापूर पालिकेत घनकचरा प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती

हर्डी येथील घनकचरा प्रकल्पामध्ये सेंद्रिय खतनिर्मिती केली जात असून, त्याला शासनाचा 'हरित ब्रॅन्ड' म्हणून मान्यताही प्राप्त झालेली आहे.

शहरामध्ये दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याद्वारे नगरपालिकेतर्फे हर्डी येथील घनकचरा प्रकल्पामध्ये सेंद्रिय खतनिर्मिती केली जात असून, त्याला शासनाचा ‘हरित ब्रॅन्ड’ म्हणून मान्यताही प्राप्त झालेली आहे. लोकसहभागातून ‘स्वच्छ आणि सुंदर’ राजापूर शहर ठेवत राजापूर नगरपालिकेने टाकाऊ आणि निष्क्रिय कचऱ्याचा सदुपयोग करत निर्माण केलेल्या या सेंद्रिय खताला शेतकऱ्यांसह बागायतदारांचीही पसंती मिळत आहे. ” त्याचवेळी या सेंद्रिय खताच्या विक्रीतून मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ‘क’ वर्गीय नगरपालिकेला भविष्यातील उत्पन्नाचा नवा हक्काचा स्रोतही उपलब्ध झाला आहे.

मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, प्रसाद महाडिक आदींच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हा खतनिर्मितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे हातही दिवसभर राबत आहेत. त्यातून तयार झालेल्या सुमारे पाच टनाहून अधिक खताची विक्रीही झाली आहे. आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले राजापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याला राजापूर नगरपालिकेतर्फे नेहमी प्राधान्य दिले जात आहे.

मुख्याधिकारी भोसले, मुख्य लिपिक जाधव आणि आरोग्य विभागातर्फे स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या नियोजनाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये लोकांनाही सहभागी करून घेतले जात आहे. विविध उपक्रम राबवून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वयंस्फूर्तीने घराची आणि परिसराची पर्यायाने शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्यात पालिका प्रशासन यशस्वी ठरत आहे. बाजारपेठेतील स्वच्छता ठेवण्यासाठी अभिनव उपक्रम राबवताना सायंकाळी बाजारपेठ बंद झाल्यावर स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

२४ तास खतनिर्मिती – विविध स्वरूपाचा दरदिवशी गोळा होणाऱ्या सुमारे तीन- साडेतीन टन कचरा केवळ गोळा न करता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. त्यामध्ये लोकांच्या नजरेमध्ये टाकाऊ असलेल्या कचऱ्याच्या साहाय्याने सेंद्रिय खतनिर्मिती (कंपोस्ट खत) केली जात आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून एक टन क्षमतेचे कंपोस्ट खतनिर्मिती मशिन घनकचरा प्रकल्पामध्ये कार्यान्वित केले आहे. या मशिनच्या साहाय्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २४ तास खतनिर्मिती होत आहे. या खताचा दर्जा उत्तम असून, त्याला शासनाचा हरित ब्रॅन्डदेखील प्राप्त झालेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular