29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमिऱ्या येथे ग्रोयन बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू

मिऱ्या येथे ग्रोयन बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू

गेल्या सप्टेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सुमारे १९२ कोटी रुपये खर्चाचा हा बंधारा एकूण ३४०० मीटरचा आहे.

पावसाळा नियमित सुरू झाल्याने मिर्‍या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा जुना बंधारा काढून तेथे नवीन बंधाऱ्याचे काम धोकादायक असते. त्यामुळे जो नवीन बंधारा झाला आहे त्या ठिकाणी टेट्रापॉडस् टाकले जात असून, आधुननिक प्रोयन पद्धतीने काम केले जात आहे. पावसामुळे गेले काही दिवस कामाचा वेग मंदावला होता; परंतु आता पावसाची विश्रांती आणि ऊन असल्याने पुन्हा त्या कामाने वेग घेतला आहे. शहरालगतच्या मिऱ्या येथील समुद्रात टेट्रापॉडस् व ग्रोयनचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जात आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सुमारे १९२ कोटी रुपये खर्चाचा हा बंधारा एकूण ३४०० मीटरचा आहे.

पाऊस नियमित सुरू होईपर्यंत त्यातील १६०० मीटरच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील बंधार बांधण्यासाठी जुन्या बंधाऱ्याचे दगड काढावे लागतात. पावसाळ्यात मिऱ्या समुद्रात उधाणाच्या मोठमोठ्या लाटा उसळतात. जुना बंधारा उघडल्यास उधाणांच्या लाटांमुळे समुद्राचे पाणी गावातील घरापर्यंत जाण्याची भीती असते. त्यामुळे जो १६०० मीटरच बंधारा पूर्ण झाला आहे त्याला पूरक असलेले टेट्रापॉडस् टाकण्याचे प्रोयन पद्धतीचे काम केले जात आहे. हे कामसुद्धा भरती-ओहोटीसह उधाणाचा अंदाज घेऊन करावे लागते. त्यामुळे ओहोटीच्या वेळेतच हे काम वेगाने होते. त्यानुसार टेट्रापॉडस् टाकण्याचे आणि बंधाऱ्याच्या पृष्ठभागाव ग्रोयन पद्धतीचे काम करून घेतले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular