27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरातील खड्डे भरण्याच्या रेसिपीतून सोशल मीडियावर विडंबन

रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्याच्या रेसिपीतून सोशल मीडियावर विडंबन

रस्ते होतील ते दर्जेदार होतील, अशी अपेक्षा होती. त्यानंतर २९ कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी नगरपालिकेला मिळाला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरवासीयांना पावसाळ्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा डांबरीकरण होऊनही शहरातील रस्त्यांची वाताहात झाली आहे. है काम करणाऱ्यांना वरदहस्त असल्याने जनतेचा पैसा वाया जात आहे. या खड्ड्यांचे सोशल मीडियावर विडंबन केले जात आहे. आजची रेसिपी, खड्डे भरणे या मथळ्यावर पालिकेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात नेटकऱ्यांनी झणझणीत अंजन घातले आहे. शहरातील पालिकेच्या केलेल्या रस्त्यांची अक्षरशः थट्टा केली जात आहे. रस्त्यांच्या दर्जावरून नागरिकांमध्येच चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील सुधारित पाणी योजनेसाठी आणि गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले गेले. त्याचा त्रास गतवर्षी सहा महिने शहरवासीयांना सहन करावा लागला. अनेकांनी लाखोल्या वाहिल्या. त्यानंतर जे रस्ते होतील ते दर्जेदार होतील, अशी अपेक्षा होती. त्यानंतर २९ कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी नगरपालिकेला मिळाला. त्यामधून शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत झाले. परंतु, आता सुरू झालेल्या पावसातच रस्ते खडबडीत झाले. नियमानुसार या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तीन वर्षे संबंधित ठेकेदाराचीच असते. त्यामुळे ठेकेदार या रस्त्यांची दुरुस्ती करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरवर्षी रस्त्यांवरच कोट्यवधी रुपये खर्च होत असून खड्डे पडतात. त्यामुळे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांचे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर वाभाडे काढले आहेत. शहरातील एक रस्ता तर सार्वजनिक बांधकाममंत्री येणार म्हणून सिलकोट टाकून गुळगुळीत करण्यात आला तो काही दिवसांतच खराब झाला. पुन्हा मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्याव दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला यंदाच्या पावसात त्याचीही वाताहात झाली आहे.

खड्डे भरण्याची रेसीपी – एका नेटकऱ्याने तर खड्डे भरण्याची रेसिपीच सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. एक डोळा व एक कान तडतडणाऱ्या फोडणीकडे कायम ठेवावा. अधूनमधून खबऱ्यांकडून किती अपघात झाले? कोणाचा बद गेला? कोणाला दुखापत झाली? याची खबरबात घेत राहावी. साधारण गणपत येण्याआधी चार-पाच दिवस शिव्यांच फोडणी छान तडतडायला लागली की, वरील साहित्य जमा करावे. जमलेच तर त्या आधी एक पत्रकार परिषद घेऊन आपण नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत व राजकीय हेतू ठेवून नसलेल्या खड्ड्यांबद्दल राजकारण सुरू आहे, असा मसाला त्या फोडणीतच घालावा. नंतर वडे तेलात सोडतो त्या सहजतेने एकेक दगड खड्डयात जमा झालेल्या केशरी पाण्यात सोडावा. खड्ड्यातल्या दगडांवर लाल माती टाकून खड्डा सजवा व नंतर ही कलाकुसर कायम ठेवण्यासाठी रोलर फिरवावा. चला कामाला लागा, अशा प्रकारे सोशल मीडियावर खड्डड्यांबद्दल विडंबन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular