29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...
HomeRatnagiriरत्नागिरी स्कायवॉक डोळ्यात भरण्यासाठी २६ लाखांची 'भर'...

रत्नागिरी स्कायवॉक डोळ्यात भरण्यासाठी २६ लाखांची ‘भर’…

शहरामध्ये पायाभूत सुविधांचे आणि नागरिकांच्या गरजेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ही २६ लाखांची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

दोन कोटी खर्च करून माळनाका येथील निरूपयोगी ठरलेले स्कायवॉक दृष्टिपथात यावे यासाठी पालिकेने नवी शक्कल लढवत २६ लाख रुपये खर्च करून व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा घाट घातला आहे. त्याची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. समाज माध्यमावर याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. ही निव्वळ उधळपट्टी असल्याचा आरोप होत आहे. विरोध वाढत असूनही पालिका प्रशासनाने हे गार्डन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील माळनाका येथे सहा वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला. माळनाका हा रहदारीचा परिसर असल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी स्कायवॉकचा वापर होईल, असा त्याचा उद्देश होता; मात्र हा उद्देश निष्फळ ठरला.

कारण, स्कायवॉकच्या पायऱ्या चढून आणि उतरून जाण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. सुरवातीला काही विद्यार्थ्यांनी त्याचा वापर केला; परंतु नंतर काही क्षणांत रस्ता ओलांडता येत असल्यामुळे स्कायवॉकच दुर्लक्षित झाले. वापर शून्य होत असल्यामुळे स्कायवॉकचा नागरिकांनी वापर करावा, या उद्देशाने एक नवी शक्कल लढवली गेली आहे. स्कायवॉकवर आता व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येणार आहे. या गार्डनसाठी जिल्हा नियोजनमधून २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आधीच स्कायवॉकचा उद्देश निष्फळ झाल्यामुळे २ कोटींचा चुराडा झाला आहे. आता त्यात आणखी २६ लाखांची भर पडणार आहे. शहरामध्ये पायाभूत सुविधांचे आणि नागरिकांच्या गरजेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ही २६ लाखांची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular