31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

लांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

जीवनसाथी अॅपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने...

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...
HomeChiplunकोकणात पडणाऱ्या अतिवृष्टी चिपळूण, संगमेश्वरसाठी २५ कोटींचा निधी

कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टी चिपळूण, संगमेश्वरसाठी २५ कोटींचा निधी

संरक्षक भिंती आदींचे नुकसान होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने, व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे होणे अत्यावश्यक.

कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे पूरपरिस्थिती तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यातून रस्ते, संरक्षक भिंती आदींचे नुकसान होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने, व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे होणे अत्यावश्यक होते. यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले. पावसाळी अधिवेशनात राज्य अर्थसंकल्पामध्ये संगमेश्वर तालुक्यासाठी ९ कोटी ४० लाख आणि चिपळूण तालुक्यासाठी १५ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे-देवरूख, मुरादपूर-मारळ-बामणोली- ओझरे कळकदरा रस्ता रुंदीकरणासह व डांबरीकरण (४ कोटी ९० लाख), देवरूख- मातृमंदिर- विघ्रवली-ओझरे काटवली-कळंबस्ते रस्ता सुधारणा व डांबरीकरण (३ कोटी ८० लाख), आरवली- येडगेवाडी मार्गावरील अरुंद व कमकुवत पुलाच्या ठिकाणी उंच लहान पुलाचे बांधकामासाठी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

चिपळूण तालुक्यातील गुहागर-चिपळूण-कराड मार्गावरील संरक्षक भिंतीसाठी २० गुहागर-चिपळूण- कराड लाख, रस्ता सुधारणा व डांबरीकरणासाठी ९० लाख, गुहागर-चिपळूण-कराड रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, गुहागर-कराड रस्ता संरक्षक भिंतीचे बांधकाम २० लाख, गणेशखिंड- तळवडे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, कळकवणे-तिवरे रस्ता संरक्षक भिंतीचे (गॅबियन वॉल) बांधकाम करणे १ कोटी ८० लाख, खेड-कामथे मार्गावरील कॉजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी) आदी कामांसाठी निधी मंजूर झाला.

RELATED ARTICLES

Most Popular