महाराष्ट्र राज्य आज कोरोनाच्या संकटामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत आहे. कोणत्याही गोष्टीला राजकीय रंग चढला कि, त्याची चर्चा जोरदार होतेच. राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोरोना महामारी सुरु झालेले वक्तव्य ऐकून जनता आता कंटाळली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण, देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि फडणवीसांची सुरु असलेली खोटी आश्वासने याचा मराठी माणसाने वीट घेतला आहे.
आम. भास्कर जाधव यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रेमाचा सल्ला दिला आहे, देवेंद्रजी तुम्ही आत्ता खरचं राजकीय संन्यास घ्या, तुमच्या जाचातून मराठी माणूस तरी मोकळा होईल. कोरोना महामारीच्या काळात गेलेली सत्ता परत मिळविण्याची संधी आल्यासारखे फडणवीस खोटे नाटे वादे जनतेस करत आहेत. मला सत्ता द्या, मी अवघ्या ४ महिन्यांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा फडणविसांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जेंव्हा सत्तेत होते तेंव्हाही अशीच धूळफेक वचने देण्यात आली होतीत, पण अद्याप ना मराठा, ना मागासवर्गीय, ना मुस्लीम समाज, ना ओबीसी समाजाला आरक्षण दिले गेले.
महाराष्ट्राने याआधीही अनेक विरोधी नेते पहिले आहेत, सरकार अडचणीत असताना राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने काम करणारे, संकट काळात सरकारला मदत करणारे, सरकार चुकले तर मार्गदर्शन करणारे आणि वाईट परिस्थिती निवळली कि, पुन्हा राजकारणात सक्रीय होणारे, पण देवेंद्र फडणवीस या जागतिक महामारीच्या संकटात सुद्धा केवळ सत्तेची लालसा ठेवून, नुसते कोणते न कोणते आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत, कधी सत्ता स्थापायला मिळेल याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. आणि आता सत्ता द्या, आरक्षण देतो अशी नवीन थाप मारायला सुरुवात केली असल्याचा सनसनाटी आरोप आम. भास्कर जाधव यांनी केला आहे.