28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...
HomeRatnagiriकोकणात शालेय सुटीमुळे एसटीचे नुकसान

कोकणात शालेय सुटीमुळे एसटीचे नुकसान

जिल्ह्यात ९ आगारातून सुमारे ६०० ते ६५० एसटी फेर्‍या शालेय विद्यार्थ्यांकरिता सोडल्या जातात परंतु या सर्वच फेऱ्या आज बंद ठेवण्यात आल्या.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशान्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या. यामुळे रा. प. महामंडळ रत्नागिरी विभागाने आज शाळांकरिता ठेवलेल्या ६०० फेऱ्या बंद ठेवल्या. आज पावसाने उसंत घेतल्याने दिवसभरात बाकी वाहतूक सुरळीत सुरू होती, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात ९ आगारातून सुमारे ६०० ते ६५० एसटी फेर्‍या शालेय विद्यार्थ्यांकरिता सोडल्या जातात परंतु या सर्वच फेऱ्या आज बंद ठेवण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यात साधारण ४ हजार २८० फेन्या सोडण्यात येतात. सध्या पावसाळ्यामुळे ग्रामीण भागातील लोक शेतीकामात व्यस्त आहेत. त्यामुळे तशी फारशी गर्दी होत नाही. त्यामुळे फेल्यांची संख्या कमी- जास्त असते.

आज अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली. यामुळे शालेय एसटी फेऱ्या सोडण्यात आल्या नाहीत. मुंबई, पुण्याच्या फेऱ्यांसंबंधी माहिती घेतली असता साधारण रत्नागिरी एसटी विभागातून ६० केन्द्रा मुंबई, बोरिवली, नालासोपारा येथे जातात. परंतु पावसामुळे प्रवाशांचा थंडा प्रतिसाद आहे. मुंबई- गोवा महामार्गाची चाचपणी करूनच या फेन्या सोडण्यात येत आहेत. पुण्याला साधारण २२ फेऱ्या रवाना होता. सध्या दोन्ही ठिकाणी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने व घाटांची स्थितीची माहिती घेऊन वाहतूक सुरळित ठेवण्यात आली आहे. महाडजवळ पुलाचा भाग आज कोसळल्याने या मार्गावरून फेऱ्या माहिती घेऊनच सोडल्या जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular