26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunवाशिष्ठीच्या नव्या पुलाचा भराव गेला वाहून...

वाशिष्ठीच्या नव्या पुलाचा भराव गेला वाहून…

अत्यंत घाईघाईत या पुलाचे काम पूर्ण करून आधी एकेरी मार्ग व त्यानंतर दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू केली; मात्र त्यानंतर या पुलाकडे दुर्लक्ष झाले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात नव्याने उभारण्यात आलेल्या वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या जोडरस्त्याचा काही भाग बुधवारी (ता. १९) झालेल्या पावसात वाहून गेला. कळबंस्तेकडील भागात हा प्रकार घडला असून, ठेकेदार कंपनीने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथे २२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या महापुरात जुन्या वाशिष्ठी पुलाच्या मध्यवर्ती भागातील भराव वाहून गेला होता. अतिवृष्टी सुरू असतानाच त्या ठिकाणी भराव करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. या घटनेनंतर नवीन वाशिष्ठी पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले.

अत्यंत घाईघाईत या पुलाचे काम पूर्ण करून आधी एकेरी मार्ग व त्यानंतर दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू केली; मात्र त्यानंतर या पुलाकडे दुर्लक्ष झाले. विशेषतः पुलाच्या जोडरस्त्याचे काम काही अंशी अपूर्ण होते. ज्या ठिकाणी जोडरस्ता पुलाला जोडला जातो त्याच ठिकाणी आरसीसी भिंतींचे काम शिल्लक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी केलेला भराव वाहून जाण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. अशातच बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात हा भराव वाहून गेला. त्यामुळे जोडरस्त्याचा काही भाग धोकादाक बनला. या घटनेची राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ दखल घेत पाहणी केली.

त्यानंतर भराव व अन्य दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या. त्याप्रमाणे गुरुवारी (ता. २०) सकाळी ठेकेदार कंपनीने त्याजागी पुन्हा भराव केला. तसेच आरसीसी भिंतीचे काम तातडीने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पुलाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा ठेकेदार कंपनीकडून देण्यात आला आहे. येथील भराव खचला तरी दुसऱ्या पुलावरून वाहतूक नियमित सुरू ठेवण्यात आली होती. हा भराव पुन्हा वाहून जाऊ नये यासाठी आरसीसी भिंतीचे काम तातडीने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular