22.7 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरीत दहशतवादविरोधी पथकाने एकाला पकडले

रत्नागिरीत दहशतवादविरोधी पथकाने एकाला पकडले

महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या पोलिसांनी आरोपांवरुन पुणे काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने या व्यक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसंच या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्याने नमूद केलं.

दरम्यान महाराष्ट्र एटीएसने अलिकडेच (२२ जुलै) पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, असंही अधिकाऱ्याने पुढे सांगितलं.

RELATED ARTICLES

Most Popular