27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriकोकणात ४० टक्के मच्छीमारांनी मासेमारीसाठी साधला मुहूर्त

कोकणात ४० टक्के मच्छीमारांनी मासेमारीसाठी साधला मुहूर्त

१ ऑगस्टला मासेमारीवरील बंदी उठली; परंतु अजूनही पावसाळी वातावरण आहे. जिल्ह्यात यलो अलर्ट आहे.

मासेमारीवरील बंदी उठल्यानतंर आज पहिल्याच दिवशी ४० टक्के मच्छीमारांनी मासेमारीची मुहूर्त साधला. सोसाट्याचा वारा असल्याने काहींनी किनारी भागात, तर काहींनी खोल समुद्रात मासेमारी केली. अनेकांना चिंगुळ, बांगडा अशी चांगली मासळी मिळाली; परंतु गीलनेटवाल्यांचा (छोटे मच्छीमार यामाहा इंजिन असलेले) वाऱ्यामुळे आजचा मुहूर्त हुकला. सागरी मासेमारी अधिनियमानुसार महाराष्ट्राच्या जलदीक्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी केली जाते. १ ऑगस्टला मासेमारीवरील बंदी उठली; परंतु अजूनही पावसाळी वातावरण आहे. जिल्ह्यात यलो अलर्ट आहे.

पावसासोबत वेगवान वारे वाहत आहे. त्यामुळे रत्नागिरी किनारी परिसरात समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे काहींनी किनाऱ्यावरच मासेमारी करणे पसंद केले, तरीही मोठ्या मच्छीमारांपैकी ३५ ते ४० टक्के नौका आज खोल समुद्रात मासेमारीला गेल्या आहेत, मात्र मच्छीमारांना मासळीचा चांगला रिपोर्ट मिळाला आहे. अनेकांना चिंगळ, बांगडा, सुरमई मिळाली आहे. छोट्या गीलनेट वाल्यांना मात्र हा मुहूर्त साधता न आल्याने त्यांची निराशा झाली. २५ साखरतर, सुमारे वीसहून अधिक नौका मिरकरवाडा येथून रवाना झाल्या आहेत. दाभोळ परिसरात मासळी मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular